हिंदूंचे नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व

           हिंदूंचे नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्व

प्रजापतिसंयुक्‍तलहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणे

गणेशयामल या तंत्रग्रंथात ‘नक्षत्रलोकातील (कर्मदेवलोकाती२७ नक्षत्रांपासून निघालेल्या २७ लहरींचे अजानजलोकात प्रत्येकी चार चरण (विभागहोऊन पृथ्वीवर

२७ ४ १०८ लहरी येतात’असे सांगितले आहेत्यांच्या विघटनाने यमसूर्यप्रजापति आणि संयुक्‍त अशा चार लहरी होतात.

प्रजापति लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची भूमीची क्षमता वाढणेबुद्धी प्रगल्भ होणेविहिरींना नवीन पाझर फुटणेशरिरात कफप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

यमलहरींमुळे पाऊस पडणेवनस्पती अंकुरणेस्त्रियांना गर्भधारणा होणेगर्भाची व्यवस्थित वाढ होणेशरिरात वायूप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

सूर्यलहरींमुळे भूमीची उष्णता वाढून वनस्पती जळणेचर्मरोग होणेभूमीची उत्पादनक्षमता न्यून होणेशरिरात पित्तप्रकोप होणे इत्यादी परिणाम होतात.

संयुक्‍त लहरी म्हणजे प्रजापतिसूर्य आणि यम या तिन्ही लहरींचे मिश्रणज्या संयुक्‍त लहरींत प्रजापति लहरींचे प्रमाण जास्त असतेत्यांना प्रजापतिसंयुक्‍तलहरी म्हणतातअशाच रितीने सूर्य संयुक्‍त आणि यम संयुक्‍त लहरीही असतात.

गुढी हे मानवी शरिराचे प्रतीक असणे

  ‘वीर्य बिजाचा आकार १ या अंकाप्रमाणे असतोशरिरात डोके शून्याच्या आकारासारखे आणि मेरुदण्ड म्हणजे त्याची शेपटी (कणाहे महत्त्वाचे आहेम्हणूनच गुढीपाडव्याला कळकाच्या काठीवर गडू ठेवून (मानवाकृती करूनत्याची पूजा करतातकाठी म्हणजे मेरुदण्ड आणि गडू म्हणजे मानवाचे डोकेकळकालाही आपल्या पाठीच्या कण्याप्रमाणे मणके असतात.’ – (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज) (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४७)

सणांचे चक्र

     माघी पौर्णिमेपासून ‘उत्सृष्टा वै वेदाः ।’ असे म्हणून ब्राह्मणांनी वेदाभ्यास थांबवून शास्त्राभ्यास चालू केल्यानंतर समाजव्यवस्थेत पालट होऊन समता निर्माण होतेसर्व भेदाभेदविधीनिषेधउच्चनीच भाव यांची होळी करण्यात या समानतेचा कळस होतोपरस्परद्वेषमारामारी आणि रक्‍तपात यांची रंगपंचमी करण्यांत तिचा शेवट होतोअशा वेळी या समतेचा कंटाळा येऊन पुन्हा नव्या व्यवस्थेचा आरंभ होतोतो दिवस म्हणजे पाडवा.

उत्पत्ती

       ‘नव्या व्यवस्थेचा आरंभ करण्याचा दिवस म्हणजे पाडवानुसता पाडवाच नव्हेतर चैत्राचा पहिला पंधरवडाच व्यवस्थेचा पाया घालण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहेकोणालाही न आवडणारीपण व्यवस्थेत अत्यंत आवश्यक अशी निःस्वार्थी सेवावृत्तीची स्थापना या पंधरवड्याच्या शेवटीपर्यंत होते.’

स्थिती

सर्वत्र सुव्यवस्था लागून तिचा शेवट जिकडे तिकडे सुबत्ता आणि स्थैर्य निर्माण होण्यात होतेहे स्थैर्य दिवाळीपर्यंत रहाते.’

लय

दिवाळीच्या वेळी पुन्हा द्यूत आणि चंगळ यांना आरंभ होऊन होळी अन् रंगपंचमीच्या वेळी पुन्हा सगळ्या गोष्टींचा शेवट होतोअसे हे मानवीवर्षातील उत्पत्तीस्थितीलय यांचे निदर्शक अशा सणांचे चक्र आहे.’

वार्षिक प्रलय संपून नवनिर्मितीला आरंभ होण्याचा दिवस

नित्य प्रलयमासिक प्रलयवार्षिक प्रलययुगप्रलयब्रह्मदेवाचा प्रलयअसे अनेक प्रलय आहेतसर्वांची गती आणि स्थिती सारखीच असल्यामुळे ‘एकाचे वर्णन करतांना दुसर्‍याचे रूपक केले’असे वाटतेपण तसे नाहीएक वार्षिक प्रलय संपून पुन्हा नवनिर्मिती चालू होण्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदाया दिवसालाच ‘पाडवा’असे म्हणतात.’

पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश

शिमग्याच्या काळात भेदभाव टाकून स्वीकारलेली समता फार काळ टिकू शकत नाहीत्यामुळे अव्यवस्था निर्माण होतेही अव्यवस्था संपवून पुन्हा व्यवस्था निर्माण करण्यास आरंभ करण्याचा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदाया दिवसापासून पुन्हा देवऋषीपितरमनुष्य आणि भूत यांची पूजा करायला आरंभ करायचात्यांचे आशीर्वाद मिळवायचे आणि आपापली कर्तव्यकर्मे करायला आरंभ करायचाहाच पाडवा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे.’

चैत्र मासातील उन्हाळ्याचा त्रास होऊ नयेम्हणून घ्यावयाचे औषध

चैत्र मास उन्हाळ्यात येतोया उन्हाळ्याचा त्रास होऊ नयेम्हणून एक औषध सांगितले आहेपाडव्याच्या दिवशी हे औषध सर्वांनी घ्यायचे असतेज्यांना उन्हाळ्याचा त्रास होतोत्यांनी नंतरसुद्धा हे औषध घ्यायला आडकाठी नाही.

पारिभद्रस्य पत्राणि कोमलानि विशेषतः ।

सपुष्पाणि समानीय चूर्णं कुर्यादि्वधानतः ।।१।।

मरीचिहिंगुलवणमजमोदा च शर्करा ।

तिंतिणीमेलनं कृत्वा भक्षयेद्दाहशांतये ।।२।।

अर्थ : कडुलिंबाची कोवळी पाने अणि फुलेमिरेहिंगमीठकैरीसाखर अन् चिंच हे सर्व साहित्य एकत्र करून ते चांगले वाटावे आणि औषध म्हणून घ्यावेजून पानांत शिरा असतात आणि त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुण अल्प होतोम्हणून विशेषकरून मिळतील तितकी कोवळी पानेच घ्यावीत.

पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ

     ‘वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्‍या बर्‍यावाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जातेहाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतोम्हणून पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकायचे असतेयाची काही उदाहरणे पाहू.

पाऊस लवकर चालू होणार असेलतर त्या बेताने शेताची मशागत अगोदर करून ठेवता येते.

पावसात खंड पडणार असेल किंवा पावसाचे प्रमाण अल्प असेलतर अशा वेळी विहिरी इत्यादींचा उपयोग व्हावाम्हणून लागणारे पाटताली इत्यादी सर्व साहित्य नीट करून ठेवता येते.

दुष्काळ पडणार असेलतर धान्य आणि वैरण यांची काटकसर करून किंवा ज्या देशांत सुबत्ता होणार वा झालेली असेलतेथून धान्यवैरण आणून साठा करता येतो अन् येणार्‍या अडचणीच्या काळाची व्यवस्था करून ठेवता येते.

कोणती पिके होण्याचा संभव आहेते जाणून त्याप्रमाणे बियाणेखत इत्यादी आणून ठेवता येते.’

संदर्भ सनातनचा ग्रंथ ‘सणधार्मिक उत्सव आणि व्रते’

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email