हवामान धोरणांच्या अंमलबजावणीत राज्यांनी सक्रिय भूमिका पार पाडावी-डॉ. हर्ष वर्धन
नवी दिल्ली, दि.०९ – हवामान बदलाविरोधातील लढा एक सामाजिक चळवळ बनायला हवी याचा पुनरुच्चार करत हवामान धोरणाच्या अंमलबजावणीत राज्य महत्त्वाचे भागीदार आहे, असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्लीत हवामान बदलावरील एका राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. हवामान बदलांच्या अंमलबजावणीत राज्यांनी सक्रीय सहभाग वाढवावा आणि स्वत:च्या उपाययोजना तयार कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. हवामान बदलाचा सामना करण्यात, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि अर्थसहाय्य या प्रमुख समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
Please follow and like us: