हवाई दलाच्या “नल” तळावर ‘वायूसेना’ प्रदर्शनाचे आयोजन
नवी दिल्ली, दि.२२ – भारतीय हवाई दलाच्या 86 व्या वर्धापनदिन समारंभाचा एक भाग म्हणून हवाई दलाच्या “नल” तळावर 21 ऑक्टोबर 2018 रोजी ‘वायूसेना’ प्रदर्शनाचे आयोजन केले होते. सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रदर्शन नागरिकांसाठी खुले होते.
नागरिकांसह सशस्त्र सेना दल आणि निमलष्करी दलातील सुमारे 1.5 लाख व्यक्ती व बिकानेर तसेच आसपासच्या शाळा-महाविद्यालयातील 12,000 विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
Please follow and like us: