हमीभाव वाढल्याने जिल्ह्यातील नागली घेणाऱ्या आदिवासींना ५३ टक्के भरघोस वाढ भात पिकालाही चांगला फायदा

(श्रीराम कांदु)

ठाणे दि.०६ – शेतमालांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ झाल्याचा सरावात जास्त फायदा ठाणे जिल्ह्यातील नागली पिक घेणाऱ्या आदिवासींना मिळणार आहे. सुमारे ५३ टक्के दर वाढ झाल्याने या गरीब आदिवासींना भरघोस उत्पन्न मिळणार आहे.

यासंदर्भात कृषी विकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे यांनी माहिती दिली की, ठाणे जिल्ह्यात ३ हजार हेक्टर वर नागली घेतली जाते. साधारणत: १९ हजार ५९३ आदिवासी हे पिक घेतात. सध्याचा नागलीचा दर १९०० रुपये प्रति क्विंटल आहे तो काल घेतलेल्या निर्णयामुळे २८९७ रुपये प्रति क्विंटल झाला आहे. सुमारे ५३ टक्के वाढ यातून मिळणार असून उत्पादनाचा खर्च मात्र पूर्वी इतकाच असून त्यामानाने उत्पन्न भरघोस मिळणार आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. ज्या प्रमुख १४ पिकांसाठी ही आधारभूत किंमत वाढविली आहेत त्यात नागलीला मिळालेली वाढ पहाता या पिकाचा बराच वरचा क्रमांक लागतो.

एक एकर नागलीसाठी लागवड आणि खाते वगैरे मिळून साधारणपणे ६५०० रुपये खर्च येतो. ५ क्विंटलच्या आसपास नागलीचे उतपादन होते असे गृहीत धरले तरी सुमारे १५ हजार रुपये एकरी त्या शेतकऱ्याच्या हातात पडतील अशी माहितीही त्यांनी दिली.

 

ठाणे जिल्ह्यात ब्भाताची लागवड ५९ हजार हेक्टर वर होते. सध्या १५५० रुपये प्रति क्विंटल दर आहे. केंद्राच्या निर्णयामुळे हा दर १७७० रुपये इतका झाला आहे. . याचा फायदा भात घेणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख २५ हजार शेतकऱ्यांना होईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट यातून साधणार असून ठाणे जिल्ह्यासाठी चांगला निर्णय आहे असेही ते म्हणाले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email