हनुमान जयंती सर्वत्र भक्तीभावात संपन्न

आज श्रीहनुमान जयंती सर्वत्र भक्तीभावात संपन्न झाली.या निमित्त आज शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.तसेच श्रीमारुतीरायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी लोटली होती.चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्रीहनुमान जयंती साजरी केली जाते. या दिवशी श्रीहनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात.महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email