हद्दपार असलेल्याला अटक

मुंब्रा-मुंबई,ठाणे,पालघर व नवी मुंबई येथून हद्दपार करण्यात आलेला मोहम्मद रफीक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.प्रतिबंधित विभागात येण्यास बंदी असतानाही तो ठाणे जिल्ह्यात राहत होता.डिसेंबर २०१६ मधे लोहमार्ग पोलीस उपयुक्तांनी त्याला मुंबई,ठाणे,पालघर व नवी मुंबई येथून हद्दपार केले होते.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शीळ डायघर पोलिसांनी सापळा रचून शीळफाटा येथून त्याला अटक केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email