हत्येप्रकरणी दोघाना जन्मठेप
कल्याण-खासगी वाहन बुक करून वाहंचालकाची हत्या करुन त्याच वाहनाने जावून एका बिल्डर व त्याच्या वाहनचालकाची ह्त्या करण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून या प्रकरणी त्यांना २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस.हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.बिल्डर अनिल दरगड यांनी त्यांच्याकडे कामाला असलेल्या संजय खड़कबहादुर दुबे याला काही कारणास्तव कामावरून काढले होते.याचा राग धरून संजय दुबे याने त्याचा मित्र जवाहर मौर्य याच्या मदतीने बिल्डर अनिल दरगड यांना मारण्याचा कट रचला. खासगी वाहन बुक करून त्या वाहनाचा चालक राजेन्द्र बनसोडे यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली.यानंतर ते वाहन चोरले व त्याच वाहनाने जावून बिल्डर अनिल दरगड यांच्या वाहनाचा पाठलाग करत त्यांच्यावर व त्यांच्या वाहनचालकावर गोळीबार केला. यावेळी कसेबसे दरगड व त्यांचा चालक हे बचावले.कुळगाव बदलापुर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व संजय दुबे आणि जवाहर मौर्य याना अटक करण्यात आली होती. याप्रकरणात सरकारी वकील दिलीप भांगरे ,पोलीस अधिकारी पी व्ही मानकर ,एस.बी.कूटे,एन.आर.हेमन यांनी काम पाहिले होते.