हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक
अंबरनाथ – हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.संजय नरवडे असे त्याचे नाव आहे.काही दिवसांपूर्वी अंबरनाथ चिंचपाडा येथून नालंबीकडे जाणा-या डोंगरातील रस्त्यावर आपल्या प्रियसीसोबत बसलेल्या एका युवकाची हत्या करून त्याच्या प्रियसीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी पोलिसांनी संजय नरवडे (३०) याला अटक केली आहे.संजय नरवडे हा रिक्शा चालाक असून त्याने ही हत्या व बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पैसे उकळण्यासाठी गणेश दिनकर आणि त्याच्या प्रेयसीला बंदुकीचा धाक दाखवत पैशांची मागणी केली व त्याचा मोबाइल आणि बुलेटची चावी मागितली. चावी आणि मोबाइल घेतल्यावर त्याने बंदुकीचा धाक दाखवत, त्याच्या प्रेयसीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याला गणेशने विरोध करताच, नरवडेने त्याच्यावर चार गोळ्या झाडून त्याचा खून केला. त्यानंतर,त्याने तिच्यावर बलात्कार केला. नरवडे याच्याकडून रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले आहे.त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.