स्‍वच्‍छता ही एक व्‍यापक लोक चळवळ होत आहे ; आयुक्‍त पी. वेलरासू

डोंबिवली –   कल्‍याण डोंबिवली महापालिकेचे स्‍वच्‍छता ‘सर्व्‍हेक्षण-2018 ‘ अंतर्गत सर्व्‍हेक्षणाचे काम सुरु आहे. त्‍याची पहाणी करण्‍यासाठी विशेष पथक येथे दाखल झाले असून, महापालिकेने स्‍वच्‍छतेसंदर्भात केलेल्‍या उपाययोजनांची माहिती त्‍यांच्‍यामार्फत घेण्‍यात येत आहे.
      आयुक्‍त पी. वेलरासू यांनी महापालिकेच्‍या अधिका-यांना विभागुन दिलेल्‍या स्‍वच्‍छते संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. स्‍वच्‍छता ही एक व्‍यापक लोक चळवळ बनली असून, ही चळवळ यशस्‍वी करण्‍यासाठी सर्वांचे योगदान महत्‍वाचे असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. महापालिकेने गेल्‍या काही दिवसांपासून राञपाळीत कचराकुंडया साफ-सफाई मोहिम हाती घेतली असून, दररोज राञी 10 ते सकाळी 6 या वेळेत कचराकुंडया मधील कचरा उचलून त्‍याची विल्‍हेवाट लावली जात आहे. शहरातील कचरा आता 2 पाळीत उचलण्‍यात येत असल्‍याने, सर्वञ रस्‍ते साफ दिसताहेत.
 महापालिका क्षेञातील सुमारे दिड लाख शालेय विदयार्थ्‍यांना स्‍वच्‍छतेचा संदेश देणारी महापालिकेची दिनदर्शिका, कापडी पिशवी आणि महापालिकेने स्‍वच्‍छतेविषयी केलेल्‍या आवाहनाची प्रत हे सर्व साहित्‍य गेल्‍या काही दिवसां पासून वाटप करण्‍यात येत आहे. शालेय विदयार्थ्‍यांनी आज रॅली काढून शहरात स्‍वच्‍छतेचा जागर केला.
या सर्व्‍हेक्षणात नागरिकांचे अभिप्राय महत्‍वाचे असून, स्‍वच्‍छतेच्‍या गुणानुक्रमासाठी या मोहिमेत आपले शहर सहभागी झाले आहे कां, तुमचे शहर गत वर्षाच्‍या तुलनेत अधिक स्‍वच्‍छ वाटते का, यावर्षी सार्वजनिक ठिकाणी ज्‍या कचराकुंडया ठेवण्‍यात आल्‍या आहेत, त्‍यांचा वापर नागरिकांनी सुरु केला आहे काय तसेच घरा-घरातुन वर्गीकृत केलेली कचरा संकलन पध्‍दती बाबत आपण समाधानी आहात काय,शहरात मुता-या आणि शौचालयाची संख्‍या वाढविल्‍याने उघडयावर प्रातर्विधी करणे अथवा लघवी करण्‍याच्‍या प्रमाणात घट झाली का,सामुदायिक व सार्वजनिक शौचालये अधिक स्‍वच्‍छ आणि वापरास सुलभ वाटतात कां, या प्रमुख प्रश्‍नांवर अभिप्राय महत्‍वाचे असल्‍याचे सांगून नागरिकांनी याबाबत त्‍यांचे अभिप्राय अवश्‍य नोंदवावेत, असे आवाहन आयुक्‍तांनी केलं आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email