स्वीय सहाय्यक पदाच्या परिक्षेत डोंबिवलीचा प्रसन्न रोङोकर देशात पहिला
डोंबिवली- विधी व न्याय विभागांतर्गत घेण्यात आलेल्या स्वीय सहाय्यक या पदांच्या परिक्षेत डोंबिवलीच्या प्रसन्न रोङोकर याने भारतात सर्वप्रथम आला आहे.
रात्र महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत असतानाच प्रसन्नने मिळविलेल्या यशाने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. ही परिक्षा मराठी भाषिक विद्याथ्र्यासाठी होती. या परिक्षेला 37 विद्यार्थी बसले होते. या परिक्षेत प्रसन्नने 95.05 मार्क्स मिळविले आहेत. या परिक्षेसंदर्भात एक जानेवारीला प्रसन्नला समजले. त्यांचा फारसा कुठे गाजावाजा केला नसल्याने परिक्षेला बसणा-या विद्यार्थ्याँची संख्या फारशी नव्हती.प्रसन्न हा श्रमसाफल्य बिल्डींग, डीएनसी रोड याठिकाणी राहतो. त्यांचे शालेय शिक्षण जोंधळे हायस्कूल येथून झाले. तर स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयातून तो वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाला शिकत आहे. त्यांचे वडील तुळशीदास हे रिक्षाचालक आहेत. आई संगीता ही गृहिणी आहे. त्याला एक मोठा भाऊ आहे. प्रसन्न नोकरी करीत असतानाच रात्रमहाविद्यालयातून शिक्षण ही पूर्ण करीत आहे. प्रसन्नची लघुलेखनातच पुढे ही करियर करण्याची इच्छा आहे.
Please follow and like us: