स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लूट करणारी आंतरराज्य हायप्रोफाईल टोळी जेरबंद

(म.विजय)

नगर – स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून लूट करणारी चार जणांची अंतरराज्यीय हायप्रोफाईल टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली.

त्यांच्याकडून ऑडी कार व फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आली. 

५ मे व ११ मे रोजी रात्री आठ वाजता शिर्डी व घोटी नाक्याजवळ आरोपींनी फिर्यादीस सांगितले होते की, सोन्याची नाणी सापडली आहेत. ते कमी किमतीत विकत आहेत, असे सांगून फिर्यादी जवळील पैशाची बॅग चोरुन नेली.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अगोदरच गुन्हा दाखल झालेला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल ही कामगिरी केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email