स्वयं सहायता बचत गटांना ९० टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर,समाज कल्याण विभागाला संपर्क साधा.
ठाणे दि २६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर देण्यात येतात.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गट पुरुष किवा महिलांचा असावा. स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे ८० टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
मिनी ट्रक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार असून स्वयंसहायता बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के स्वहीस्सा भरल्यानंतर (डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात) 90टक्के म्हणजे (कमाल रुपये 3.15 लाख ) शासकीय अनुदान मिळेल. समाज कल्याण अधिकारी जाहिरातीद्वारे अर्ज मागवतील.स्वयंसहायता बचत गटाची संख्या प्राप्त झालेल्या उद्धीष्टापेक्षा जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने वाटप केले जाईल.
निवड झालेल्या अनुसूचित जातीतील व नवबौद्ध घटकातील इच्छुक स्वयंसहायता बचत गटांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पाचवा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम दूरध्वनी २५३४१३५९ येथे संपर्क साधावा.
——————————
३० डिसेंबर रोजी निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा
ठाणे दि . २६ : जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांचा त्रैमासिक Lमेळावा शनिवार ३० डिसेंबर रोजी जिल्हा कोषागार कार्यालय , पहिला मजला,जिल्हाधिकारी कार्यालय आवर ठाणे येथे ठिक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे . तरी सर्व निवृत्तीवेतन धारकांनी मेळाव्यास उपस्थित राहून लाभ घ्यावा असेआवाहन जिल्हा कोषागार अधिकारी स्मिता कुलकर्णी यांनी केले आहे .