स्वयंपाकाच्या गॅससाठी आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार

घरगुती गॅस आता आणखी महागला. स्वयंपाकाच्या गॅससाठी आता सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. स्वयंपाकाचा अनुदानित गॅस सिलेंडर ४५ तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर ३० रुपये ५० पैशांनी महाग झालाय. त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणारय. गेल्या काही दिवसांत पेट्रोलियम उत्पादनांमध्ये वाढ झालीय.

हेही वाचा :- कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकली

जून आणि जुलै महिन्यात विना अनुदानीत गॅस सिलिंडरच्या किमतीत ७७ रुपये आणि ८३.५० पैशांनी वाढ झाली होती. तर अनुदानीत सिलिंडरच्या किंमतीत २.३४ रुपये आणि २.७१ रुपये प्रती लिटर वाढविण्यात आले होते. दरम्यान, आज पहिल्यांदाच रुपयांचा दर डॉलरच्या तुलनेत ७१ रुपये झाला. याचाही परिणाम हा गॅस दरवाढीवर झालाय.

हेही वाचा :- रेल्वे तिकीटांवरची मोफत विमा सेवा बंद

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसर यामुळे गॅसच्या किंमतीत वाढ झालेय. तिसऱ्या महिण्यात लागोपाठ वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत सिलिंडर ३०.५० पैशांनी महाग झाला असून तो १४०१.५० रुपयांना उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.