स्वच्छतेबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांना धरले धारेवर

डोंबिवली दि.१९ – शहर, गाव स्वच्छ ठेवा असा संदेश देणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कार्यालये अस्वच्छ असल्याचे पाहून पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी अधिकाऱ्यांनी कार्यालय लवकरच स्वच्छ करून घेतो असे सांगत वेळ मारून घेतली. वास्तविक डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात अस्वच्छता आणि काही ठिकाणी सामान टाकून ठेवल्याची तोंडी तक्रार नागरिकांनी केली होती. मात्र येथील अधिकाऱ्यांनी यावर आजवर लक्ष दिले नव्हते.

हेही वाचा  :-  पालिका आयुक्तांनी केली डोंबिवलीतील आपत्कालीन कक्षाची पाहणी

पालिका आयुक्त बोडके यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयाची पाहणी केल्यानंतर येथील अस्वच्छतेबाबत पालिका अधिकारी परशुराम कुमावत, अमित पंडित आणि इतर अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. प्रवेशद्वारा समोरील जागेत अडगळीत समान ठेवण्यात आले. सदर समान ठेकेदाराने ठेवल्याची सांगत अधिकाऱ्यांनी सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयात येताना नागरिकांना प्रसन्न वाटावे असे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा असा सल्लाही बोडके यांनी दिला. कार्यालयातील कर्मचारी वर्ग यांचेही कामाकडे लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणटले आहे. सदर कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र स्वच्छेकडे कानाडोळा झाल्याचे दिसते. दरम्यान या कार्यालयात जाण्यासाठी इंदिरा चौकातील जुना प्रवेशद्वार पुन्हा सुरु होणार आहे.

हेही वाचा  :-अभिनेते आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email