स्वच्छतेच्या शाश्वततेबाबत अधिकारी साधणार नागरिकांशी संवाद,१९ नोव्हेंबर रोजी साजरा होणार जागतिक शौचालय दिन
( श्रीराम कांदु )
ठाणे दि १८ नोव्हेंबर : १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी एका गावाची जबाबदारी घेवून संपूर्ण दिवस ग्रामस्थांसोबत घालवणार असून नागरिकांना स्वच्छतेच्या शाश्वततेबाबत विविध माहिती देवून संवाद साधणार आहेत.
या दिनाचे औचित्य साधत कला पथक , पथनाट्य , फिरती प्रदर्शने यासारख्या उपक्रमासोबत शौचालयाच्या वापराबाबत आग्रह करण्यात येणार आहे. यावेळी गृहभेटी , कोपरा बैठक , समूह चर्चा , तरुण गटांसोबत चर्चा तसेच भजनी मंडळ यांसोबत बैठकांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणीपुरवठा) मानसी बोरकर यांनी सांगितले.
Please follow and like us: