स्त्रीभ्रूण हत्या आणि बाल लैंगीक शोषण रोखणाऱ्या डॉक्टरांची पोलिसांकडून छळवणूक
नगर – आदिवासी आणि दुर्गम अकोले तालुक्यातील स्त्री भ्रूण हत्या आणि बाललैंगीक शोषण रोखण्यासाठी मागील एक दशकापासून स्वयंसेवी संस्थासोबत काम करणारे वैद्यकीय व्यावसायिक डॉ. बाबासाहेब गोडगे यांची राजूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून छळवणूक होत असल्याची तक्रार स्नेहालय संस्थेने जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अशा त्रासामुळे वरील विषयात डॉक्टरांचे स्वारस्य कमी झाल्यास अनेक संकट ग्रस्त महिला आणि बालकांचे जीवन धोकादायक बनू शकते, असे स्नेहालयाने निवेदनात म्हटले आहे. मागील ३० वर्षांपासून स्त्री भ्रूण हत्या, बाललैंगीक शोषण या विषयांवर स्नेहालय संस्था पथदर्शी काम करीत आहे. या उददेशासाठी समविचारी डॉक्टर, कार्यकर्ते, संस्था यांचे कार्यजाळे जिल्हात निर्माण झाले आहे. दि. १२/०२/२०१८ रोजी एक बालिका शिरपुंजे ता. अकोले येथून आजारी असल्याने राजूर येथील स्वामी समर्थ रूग्णालयात पालकांसोबत आली. येथे डॉ.बाबासाहेब गोडगे यांनी तिची तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर ही बालिका गर्भवती असल्याची शंका डॉ.गोडगे यांना आली .यासंदर्भात माहिती घेताना ही बालिका १५ वर्षांची असल्याचे समजले. याबद्दल पालकांशी संवाद करण्याचा प्रयत्न डॉ. गोडगे यांनी केला. तथापि या मुलीस घेवून तिचे पालक दवाखाण्यातून परसस्पर निघून गेले . या संदर्भात स्नेहालय संस्थेचे काम माहिती असल्याने अशा प्रसंगी करावयाच्या पुढील कायदेशीर कारवाईबाबत डॉ.गोडगे यांनी स्नेहालयकडे मार्गदशन मागीतले.
आशा वेळी मुलीच्या निश्चित , ती गर्भवती असल्यास तिचे आणि तिच्या पालकांचे समुपदेशन करून त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क करणे आवश्यक असल्याचे संस्थेने डॉक्टरांना सांगितले. तसेच अशा प्रकरणात बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पोस्को) आणि भारतीय दंड दंड विधानाच्या कलमानुसार कशा प्रकारे गुन्हा दाखल केला जातो,दंड विधानाच्या कलमानुसार कशा प्रकारे गुन्हा दाखल केला जातो. संस्थेने डॉ. गोडगे यांना सांगितली. या प्रकरणातील बालिका दुर्गम ठिकाणी राहत असल्याने प्रथम या कुटुंबाचा शोध लावणे महत्वाचे होते.
त्यानुसार स्नेहालयाची टिम आणि डॉ. गोडगे यांनी प्रचंड कष्ट घेऊन मध्यरात्री हे कुटुंब शोधले. त्यांचे समुपदेशन करून १३ फेब्रुवारी २०१८ रोजी पहाटे ३:३० वाजता पोलीस ठाण्यात या सर्व कुटुंबाला आणण्यात आले. त्यानंतर सकाळी मुलीची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते. परंतु पोलीसांकडे वाहनाची अडचण होती. त्यामुळे स्नेहालयाने सकाळीच जिल्हा शासकिय रुग्णालयात पोलीस पथक आणि बळी बालिकेला तपासणीसाठी आणले.
दि. १४ फेब्रुवारी २०१८ रोजी स्नेहालय टिमने पुन्हा आपल्या वाहनातून राजूर पोलीस ठाण्यात आणले. येथे बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (Posco) च्या कलम ४,५ (२) (N) आणि भा.द.वि. च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. स्नेहालय टिमने पंचनाम्यातही सहभाग दिला. या सर्व प्रकरणात सदर मुलीला न्याय मिळावा, या प्रकरणी गुन्हा नोंद व्हावा म्हणून डॉ. गोडगे यांची भुमिका महत्वाची होती.
तथापी दि. १७ फेब्रुवारी २०१८ पासुन राजूर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी डॉ. गोडगे यांना धमकावणे सुरु केले. सि.आर.पी.सी. १६० अनुसार दि. २० फेब्रुवारी २०१८ रोजी पोलीस ठाण्यात हजार राहण्याची नोटीस त्यांना बजाविण्यात आली. यानंतर पुन्हा दि. ८ मार्च २०१८ रोजी हजार राहण्याची लेखी तंबी डॉ. गोडगे यांना पोलिसांनी दिली. या सर्व प्रकरणात बाल हक्कांसाठी गेली अनेक वर्ष बालसेवी संस्थासोबत निरलसपणे काम करणाऱ्या डॉ. गोडगे यांची अकारण छळवणूक पोलीस करत असल्याची तक्रार स्नेहालयाने केली आहे.