स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर पांढरा पट्टा मारण्यास पालिकेला विसर,मनसेने विचारला जाब

(श्रीराम कांदु)
       स्टेशनपरिसरातील फेरीवाल्यांवर पालिका प्रशासन कारवाई करत असताना दुसरीकडे स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर पांढरा पट्टा मारण्यास पालिकेने कानाडोळा करत आहे. गुरुवारी फेरीवाल्यांनी या कारवाईला आक्षेप घेत रामनगर पोलीस ठाण्यात मोर्चा काढला होता. पालिका प्रशासन याकडे का लक्ष देत  नाही याचा जाब शनिवारी मनसेने विचारला. मात्र नेहमीप्रमाणे पालिका आयुक्त पी. वेलारासु यांनी होणाऱ्या  प्रशासकीय  अधिकाऱ्यांबरोबर  होणाऱ्या  बैठकीत  सकारात्मक  निर्णय  घेऊ असे आश्वासन दिले.
          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  नेते  प्रमोद (राजु ) पाटील मनसेचे  विरोधी पक्षनेते  मंदार हळबे , गटनेते  प्रकाश भोईर, जिल्हा  संघटक  हर्षद  पाटील,  जिल्हा  सचिव  प्रकाश माने, जिल्हा संघटक राहुल  कामत,  शहर सचिव  अरुण  जांभळे, माथाडी  सेनेचे राजन शितोळेंसह पदाधिकारी यांनी पालिका आयुक्त पी. वेलारासु यांची भेट घेतली. स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर पांढरा  पट्टा  अजुन  का मारला जात नाही  याचा जाब विचारला.  यावेळी   आयुक्तांनी  मंगळवारी  होणाऱ्या  प्रशासकीय  अधिकाऱ्यांबरोबर  होणाऱ्या  बैठकीत  सकारात्मक  निर्णय  घेऊ असे आश्वासन दिले. महापालिका  चतुर्थश्रेणी कर्मचारी  वर्गावर निलंबनाची  कारवाई  करते मात्र  उच्च  पदावर  कार्यरत  असलेल्या  अधिकारी  वर्गावर ती जाणीवपुर्वक टाळली जाते असा आरोप  प्रदेश उपाध्यक्ष  राजेश कदम  यांनी  केला. तुम्ही  कारवाई  करण्यात  कुचराई  का करत आहात असा सवाल सरचिटणीस  माननीय    प्रकाश भोईर यांनी  केला.  यावर सकारात्मक  प्रतिसाद  न मिळाल्यास  आम्हाला  पुन्हा  एकदा  जनआंदोलन  उभारावे  लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसेच्या पदाधिकार्यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात याच विषयासंदर्भात निवेदन दिले होते. पालिकेने जर लवकरात याकडे लक्ष दिले नाही तर मनसे स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर पांढरा पट्टा मारेल असा इशारा दिला होता.  फेरीवाल्यांनी पोलीस ठाण्यात मोर्चा काढण्यानंतर मनसेने पालिका प्रशासनला जाब विचारला.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email