स्टिफन हॉकिंग यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई – ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या निधनाने विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे सोप्या भाषेत उलगडणारे आणि वैज्ञानिक संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे एक महान व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात,  हॉकिंग हे संशोधन क्षेत्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर दुर्धर आजाराशी संघर्ष करीत त्यांनी आयुष्यभर केलेले संशोधन कार्य अभूतपूर्व असून या क्षेत्रासाठी दीपस्तंभी आणि प्रेरणादायी आहे. याबरोबरच प्रदीर्घ काळ ज्ञानदान करून त्यांनी शास्त्रज्ञांच्या नव्या पिढ्या घडविण्याचा निष्ठेने प्रयत्न केला. बिग बँग आणि कृष्णविवरांसंदर्भातील सविस्तर वर्णन असलेले अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक एक अजरामर लिखाण आहे. त्यांच्या निधनाने विज्ञान जगताला लोकाभिमुखतेची दिशा देणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email