डोंबिवली – कल्याण मध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढला असून वाढत्या कारवाया मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत .काल दिवसभरात भुरट्या चोरट्यांनी एका स्कूटर च्या डिक्की मधून ४५ हजारांची रोकड तर एका कारचा दरवाजा उघडून कारमधील ४९ पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .कल्याण पश्चिम रेतीबंदर दुधनाका येथे राहणारे तारिक मुस्तोफा ५६ हे काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आपल्या स्कूटर च्या डिक्की मध्ये ४५ हजार रोकड ठेवून मुरबाड रोड येथील बँकेत गेले होते.त्यांच्यावर नजर ठेवणाऱ्या अज्ञात चोरट्याने ते बँकेत जातच स्कूटरच्या दिक्कीचे लोकं उघडून ४५ हजार रोख रक्कम व गाडीचे कागद पत्र चोरूण पळ काढला ,चोरी झाल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .तर कल्याण पश्चिम साई हॉल समोरील गुरुनानक अपार्टमेंट मध्ये राहणारे कामेंद्र दाहाट यांनी काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौक येथील शॉपिंग सेंटर शेजारी आपली कार उभी करून शॉपिंग सेंटर मध्ये गेले होते .हि संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या कार चा दरवाजा उघडून गाडीमधील लपतोप व इतर सामना असा मिळून एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी दाहाट यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दखल केला आहे.