सोशल मीडिया वर बनावट खात्यांवर प्रतिबंधक कारवाई करण्याची मागणी

परळी – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शैलेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली परळी शहर व तालुक्यातील मुलींच्या नावे सोशल मीडियावर (फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर ) बनावट खाते उघडून मुलींची नाहक बदनामी करणाऱ्या वर कडक कारवाई करावी अशी मागणी मनविसे शहराध्यक्ष हनुमान सातपुते यांनी निवेदना द्वारे उप अधीक्षक सुरेश गायकवाड यांना देण्यात आले.

बनावट सोशल मीडिया खात्यावरून मुलीची बदनामी होत असुन आपण या सायबर क्राईम मार्फत चौकशी करून हे बनावट खाते बंद करावे व मुलींची होणारी बदनामी थांबवावी असे निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस उपअधीक्षक अंबाजोगाई विभाग यांनी या विषयी जिल्हा पोलीस अधीक्षकांना चर्चा करून बनावट खाते उघडणाऱ्या वर कडक कारवाई करू अशी ग्वाही दिली.

या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ, ता.उपाध्यक्ष संजय राठोड , मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष शिवहार भरडे, मनविसे चे ता.अध्यक्ष फारुख पठाण ,मनविसे शहराध्यक्ष हनुमान सातपुते आकाश चव्हाण , किरण राठोड, दिनेश निकम, धीरज भरडीया, निलेश राका,अतुल साळवे, मोहन गायकवाड, शायाद मरकज, रमन बदने सह आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.