सोलापूर महानगरपालिकेत मलईदार पदांसाठी सेना-भाजपमध्ये सेटिंग

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेचे एकमेकांशी जरा सुद्धा पटत नसताना ते महापालिकेच्या ७ विषय समिती सभापती निवडणुकीसाठी व मलईदार पदांसाठी एकत्र आले व आपसातील रुसवे फुगवे बाजूला ठेवले. विशेष म्हणजे विरोधकांना अंधारात ठेवून शिवसेनेचं आणि भाजपचं मनोमिलन झालं आहे.

शिवसेनेने आणि भाजपने एकत्र येऊन लढल्यामुळे समितीच्या सभापती पदाच्या ४ जागा भाजपच्या पदरात पडल्या तर शिवसेनेच्या वाट्याला ३ जागा आल्या आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपाने या निवडणुकीवर बहिष्कार घातल्याने सर्व जागा बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा स्वतः पीठासन अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केली.

अखेर मलईदार पद पदरात पडल्यावर पालिकेचा कारभार चांगला आणि नेटका करणार असल्याचे स्वतः उपमहापौरांनी सांगितल आहे. त्यामुळे वर्षभरापासून सुरु असणारे वाद पालिकेतील मलईदार पदांच्या निवडणुका आल्या की कसे काय मिटतात असा प्रश्न स्थानिक जनतेला पडला आहे.

सोलापूर महानगरपालिकेतील एकूण ७ सात विषय समिती सभापती पैकी,

१. स्थापत्य समितीसाठी – गुरूशांत धुत्तरगांवकर (शिवसेना),
२. शहर सुधारणा समितीसाठी – शालन शिंदे (भाजप)
३. वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समितीसाठी – वरलक्ष्मी पुरूड, उद्यान, (भाजप)
४. मंड्या समितीसाठी – कुमूद अंकाराम (शिवसेना)
५. विधी समितीसाठी – विनायक कोंड्याल (शिवसेना)
६. कामगार व समाजकल्याण समितीसाठी रवी कैय्यावाले (भाजप)
७. महिला बालकल्याणसाठी रामेश्वरी बिर्रू (भाजप)

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email