सोनू निगमला कट्टरपंथी संघटनांकडून धोका

सोनू निगमने सकाळी मशिदींच्या भोग्यांवरून देण्यात येणाऱ्या आझानविरूद्ध ट्विटरवरून नाराजी व्यक्त करणारा सोनू निगम कट्टरपंथियांच्या निशाण्यावर असल्याचा खुलासा राज्यातील गुप्तचर विभागाने केला आहे.याबाबतीत राज्यातील गुप्तचर विभागाने गृह मंत्रालयाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.काही कट्टरपंथी संघटना सोनू निगमवर हल्ला करण्याचे कारस्थान रचत असून एखाद्या प्रमोशन दरम्यान किंवा सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर हल्ला होवू शकतो त्यामुळे सोनू निगमची सुरक्षा वाढवायचा सल्ला गुप्तचर विभागाने दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सोनू निगमने मीडियाशी बोलताना सांगितले की, सध्या मी दिल्लीमध्ये आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या माहिती मला समजली परंतु मुंबई पोलिसांकडून त्याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मी केलेल्या अझान संदर्भातील वक्तव्यावरून माझ्यावर काही लोकांचा राग असण्याची शक्यता आहे, माझा देवावर विश्वास आहे आणि तो सगळं काही ठीक करेल.’

काही दिवसांपूर्वी सोनू निगमने सकाळी मशिदींच्या भोग्यांवरून देण्यात येणाऱ्या आझानविरूद्ध ट्विटरवरून हल्ला चढवला होता. सोनू निगमच्या या विधानाननंतर ट्विटरवर शाब्दीक युद्ध सुरू झाले होते आणि बघता बघता हा वाद वाढून त्याचे रूपांतर धार्मिक वादात झाले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनकडून कोणतीही माहिती मिळालेली नसून मुंबई पोलिसांचे प्रवक्ते दीपक देवराज यांनी यासंदर्भात कोणतेही वक्तव्य करण्यास नकार दिला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email