सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्नात १५ वर्षीय मुलावर गोळी झाडण्यात आली
नवी दिल्ली, दि.२२ – दिल्लीततील शालीमार बाग परिसरात सोनसाखळी चोरांना पकडण्याचा प्रयत्न करणार्या 15 वर्षीय मुलावर गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा रोहित क्लब रोडवर सकाळी 7.30 वाजता नारळ विकत होता. त्यावेळी त्याच्या स्टॉलवर उभ्या एका व्यक्तीची दोन दुचाकीस्वारांनी साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. चोरांना पळून जाण्यापासून रोखण्यासाठी रोहितने त्यांना अडवले. यावेळी त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीदरम्यान एका आरोपीने गोळी चालवली. ही गोळी रोहितच्या खांद्याला लागली. जखमी अवस्थेत त्याला फोर्टिज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Please follow and like us: