सेवा आणि कर (जीएसटी ) कमी होऊनही डोंबिवलीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंना उठाव नसल्याने व्यापारी अस्वस्थ

डोंबिवली दि.१२ – केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक वस्तुंवर आकारेला वस्तू व सेवा कर (जीएसटी ) दहा टक्के कमी केला आहे. श्रावण महिना सुरु झाल्याने आता सणा सुदीचे दिवस सुरु होतील पण तरीही फ्रीज ,वॉशिंग मशिन, आदी इलेक्ट्रॉनिक वस्तुंना गेले वर्षभर उठाव नाही निदान कर कमी झाल्यावर तरी खप वाढेल अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत होते मात्र अजून ग्राहक दुकानांकडे फिरकत नसल्याने व्यापारी अस्वस्थ झाले आहेत.

केंद्र शासनाने ३१ जुलै रोजी २८ टक्के जीएस्टी कर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जाहीर केले व व्यापा-यानी तीव्र नाराजी दर्शवल्यानंतर एक वर्षानी हा कर दहा टक्के कमी केला यामुळे तरी आता ग्राहक येतील असा विश्वास व्यापा-याना होता. पण सणासुदीचे दिवस जवळ आले तरी ग्राहकांनी अजूनही पाठ फिरवली आहे यामुळे संपूर्ण मार्केट थंडावले आहे. महाराष्ट्रात विविध सणा-सुदीचे दिवस जवळ येत असून त्यानिमित्त खरेदी वाढेल असे व्यापा-याना वाटत होते व त्यामुळे त्यानी मोठया प्रमाणात वस्तुची मागणी नोंदवली पण ग्राहकच फिरकत नसल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

यासंदर्भात दिपक शिरोडकर (दुकानदार) यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, केंद्राने वर्षापूर्वी २८ टक्के जीएसटी लावल्यानंतर ग्राहकांना वाटले की इलेक्ट्रॉनिक वस्तुंच्या किंमती वाढल्या आहेत यामुळे ग्राहकांनी खरेदी बंद केली खर म्हणजे २८ टक्के कर लावूनही इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती अवघ्या ७०० ते ८०० रुपयांनी महाग झाल्या. ही गोष्ट ग्राहकांपर्यत पोहेाचली नाही. परिणामी व्यापार थंडावला आता केंद्र शासनाने जीएसटी कर कमी केल्याने फ्रीज ,वॉशिंग मशिन,एलइडी (२४ इंची) यांचे दर कमी झाले आणि तरीही मालाला उठाव नाही.

नोटबंदीनंतर जो फटका बसला त्याचा परिणाम व्यापारी अजूनही भेागत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता सणाचे दिवस सुरु होतील व मालाला उठाव मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.