सेल्फी विथ कॅम्पस अभियान

सेल्फी विथ कॅम्पस या अभियान अंतर्गत आज अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चौहान ह्यांनी कल्याण मधिल बिर्ला महाविद्यालय आणि उल्हासनगर मधिल CHM आणि RKT महाविद्यालयाना भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे नावीन्यपूर्ण उपक्रम जाणून घेऊन प्राचार्यांशी चर्चा केली.

सेल्फी विथ कॅम्पस या अभियान अंतर्गत संपूर्ण भारतातील 1 लाखहुन अधिक कॉलेज कॅम्पसना अभाविप कार्यकर्ते भेट देणार. भारतातील सर्व कॉलेज कॅम्पसेस पर्यंत पोहचणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे व अभाविपचे विविध उपक्रम त्यापर्यंत पोहचवणे अशा उद्देशाने संपूर्ण भारतात 4 ऑगस्ट पर्यंत हे अभियान चालू आहे.

विविध महाविद्यालयात अभाविपचे कार्यकर्ते तेथील विद्यार्थ्यांनसोबत सेल्फी घेऊन तसेच विद्यार्थ्यांनच्या समस्या जाणणे, संवाद साधणे, त्या महाविद्यालयाचे उपक्रम समजून घेणे चालु आहे.

कल्याण येथे उपक्रमात अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री आशिष चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य मिहिर देसाई, जिल्हा संयोजक अमोल साळुंखे, कल्याण शहरमंत्री सुशांत शेलार, संघटमंत्री  ज्ञानेश्वर पवार हे उपस्थित होते.

ह्या वेळी कल्याण पश्चिमचे लोकप्रतिनिधी आमदार नरेंद्र पवार ह्यांची देखील भेट घेण्यात आली.
आपल्या कॉलेज कॅम्पस सोबत सेल्फी घेण्याच्या ह्या अनोख्या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभाविप कल्याण जिल्हा अंतर्गत डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर ह्या शहरांत हा उपक्रम चालू आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email