सेल्फी घ्यायला गेलेली महिला दरीत कोसळली
माथेरानच्या लुईस पॉइंट इथल्या ५०० फूट दरीजवळ असलेला कठडा ओलांडून आपल्या पतीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेल्या.महिला पर्यटकांनं आपला जीव गमावलाची घटना काल संध्याकाळी घडली असून एक मुलगी आणि मुलगा व मेहुणी आणि सरिता व त्यांचे पती असा ५ जणांचा परिवार दिल्लीतून खास माथेरानला आला होता. काल संध्याकाळी त्या माथेरानच्या लुईस पॉइंट येथे आपले पती राममहेश यांच्यासोबत फिरायला गेल्या होत्या. लुईस पॉइंट इथल्या ५०० फूट दरीजवळ असलेला कठडा ओलांडून सरिता आपल्या पतीसोबत सेल्फी काढण्यासाठी गेल्या. पावसाळी वातावरण असल्याने कड्या किनारी वारे वाहत असतात. याचवेळी सोसाट्याचा वारा आला आणि त्यामुळे सरिता यांचा तोल गेला आणि त्या ५०० फूट दरीत कोसळल्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. घटनास्थळी शोधकार्य सुरू झाले आहे.
Please follow and like us: