सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाने आपला जीव गमावला

लाटांमुळे होणारी झीज रोखण्यासाठी कठडय़ाखाली मोठय़ा प्रमाणात कॉंक्रिटचे दगड टाकण्यात येतात. मरिन ड्राइव्हवर आलेले दोन तरूण सेल्फी घेण्याच्या नादात त्या दगडांवर उतरले इतक्यात एकाचा पाय सरकला आणि ओहोटीच्या लाटांमध्ये बुडाला. अपघातानंतर मित्राने तेथून पलायन केले. तर तरुणाला वाचविण्यासाठी पर्यटकांमधील एक तरूणाने समुद्रात उडी मारली मात्र तोही जखमी झाला. या तरूणाला पोलीस, पर्यटकांनी समुद्रातून बाहेर काढले. मात्र बुडालेल्या तरूणाला २० मिनिटांनंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याला तातडीने जीटी रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ही घटना शनिवारी दुपारी घडली असून मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email