सेल्फी काढण्याच्या नादात पती-पत्नी आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा नदीत वाहून गेल्याचे घटना पूर्णा नदीच्या पुलावर घडली
सेल्फी काढण्याच्या नादात पती-पत्नी आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा नदीत वाहून गेल्याचे घटना बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या पुलावर घडली असून सुत्रांच्या माहितीनुसार, बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे कर्मचारी राजेश गुलाबराव चव्हाण, त्यांची पत्नी व बारा वर्षांचा मुलगा हे या पुरामध्ये वाहून गेले आहेत. पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असताना नदीवरील खिरोडा पुलावर उभे राहून ते सेल्फी घेत होते. पोलिसांना या कुटुंबाची मोटरसायकल, चष्मा व चप्पल असे साहित्य येथे आढळून आले आहे.
हेही वाचा :- वरिष्ठ कांग्रेस नेता गुरुदास कामत का निधन | मुंबई आस पास
राजेश चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बन या पतसंस्थेत कार्यरत होते. आपल्या कुटुंबासह ते मोटरसायकलवरुन शेगावकडे येत होते. दरम्यान, खिरोडा नजीक रस्त्यामध्ये लागलेल्या पूर्णा नदीचे दुथडी भरून वाहणारे पाणी पाहण्यासाठी ते पुलावर थांबले. त्यानंतर पाण्याजवळ जावून सेल्फी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, पाण्याला वेग असल्याने त्यांचा तोल जाऊन ते पत्नी आणि मुलासह नदीत वाहून गेले.