सुभाष हरड यांच्या हस्ते बक्षीस वितरण

 24 ते 26 फेब्रुवारी 2018 रोजी सलग 3 दिवस किन्हवली परिसरातील खरीवली येथे नाईटचे प्रकाश झोतात कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते.
             खरीवली (सो) येथील पिरसाई व ओम साई मित्र मंडळाने हे कबड्डीचे सामने आयोजित केले होते. पिरसाई मित्र मंडळाचे शरद हरड ( मेजर ) यांच्या संकल्पनेतून हे सामने आयोजित केले होते.
            3 दिवस चाललेल्या या कबड्डीच्या सामन्यांमध्ये जवळपास 57 पुरुष संघांनी भाग घेतला होता.तर 6 महिला संघांनी सहभाग घेतला होता. या सामन्यांमध्ये वासिंद संघ प्रथम,  द्वितीय धसई, तृतीय ओम साई खरीवली, चतुर्थ बोरशेती, पाचवे शार्प 7 मुगाव, सहावे पिरसाई खरीवली मानकरी ठरले.
               या 3 दिवस चाललेल्या कबड्डी सामन्यांना माजी खासदार सुरेश टावरे, आमदार पांडुरंग बरोरा,मा. आमदार दौलत दरोडा, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पष्टे, टिडीसी बँक संचालक कैलास पडवळ, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती निखिल बरोरा आदी लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या.
         या सामन्यांचे बक्षीस वितरण समारंभ खरीवली गावचे सुपुत्र, भाजपचे पंचायत समिती सदस्य तथा गटनेते सुभाष हरड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email