सुब्रमण्यम स्वामी यांची जहरी टीका,राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच

( म विजय )

कल्याण – एकीकडे शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचं गुणगान गात असली, तरी राहुल गांधी हे अजूनही बुद्धू आणि नालायकच आहेत, असं म्हणत राज्यसभा खासदार आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय.

सुब्रमण्यम स्वामी हे डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांवर तुफान फटकेबाजी केली. मशिदीत फक्त नमाज पढतात, जो कुठेही पठण केला जाऊ शकतो, मात्र राममंदिर हे रामजन्मभूमीतच उभं राहणार असा दावा त्यांनी केला. शिवाय याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात आपणच जिंकू, मात्र त्यापूर्वी श्री श्री रविशंकर मध्यस्थी करून तोडगा काढणार असतील, तर त्याचं स्वागतच असेल, असं स्वामी म्हणाले. तर काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याची पी. चिदंबरम यांची मागणी त्यांनी धुडकावून लावली.

दुसरीकडे राज ठाकरे यांनी कालच डोंबिवलीत गुजरात निवडणुकीत भाजपा निवडून आली तर ते इव्हिएम मशीनचं यश असेल, असं म्हणाले होते, त्यांना उत्तर देताना मशीनमध्ये घोळ करणं शक्य नसल्याचं स्वामी म्हणाले, शिवाय राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याचा पलटवारही त्यांनी केला.

दुसरीकडे राहुल गांधींवरही त्यांनी हल्लाबोल केला. शिवसेना आणि मनसे राहुल गांधींचं गुणगान गात असली, तरी तो त्यांचा प्रश्न आहे. माझ्या लेखी राहुल गांधी बुद्धू आणि नालायकच आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
[08:54, 10/29/2017] Vijay Durge: 👉 मनसेने विचारला स्वामींना जाब : ठाकरे यांचा डीएनए काढण्याचा अधिकार स्वामी यांना कोणी दिला. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राज ठाकरे व यूपीच्या लोकांचा डीएनए एकच असल्याचे वक्तव्य केल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह धाव घेतली. यावेळी स्वामी कार्यक्रम आटोपून परतण्याच्या तयारीत होते. त्यावेळी कदम यांनी स्वामी यांनी तुम्ही मराठी माणसासाठी काय केले. राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी जे काम केले आहे. ते तुम्ही केले आहे का. तुम्हाला त्यांचा डीएनए काढण्याचा अधिकार काय असा सवाल उपस्थित करून फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तुम्ही काही एक भाष्य केले नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email