सुनेकडून सासु सासऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण !
अहमदनगर – नगर – कल्याण रोडवर सुनेकडून सासु सासऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी दोन दिवसापुर्वी घरात झालेल्या भांडणाच्या कारणावरून ज्ञानदा चेतन रोहकले(रा.विदया कॉलनी आदर्शनगरच्या मागे, कल्याण रोड ,अ.नगर) हीने सासु अरूणा रोहकले यांना दमदाटी करून शिवीगाळ केली व
उजव्या हाताला चावुन दुखापत केली.तसेच सासऱ्याच्या तोंडात चापटीने मारून चष्मा तोडला व तुमच्याकडे पाहुन घेईन,तुमच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेल असे म्हणत स्वताच्या हाताची नस कापून टाकली.दमदाटी केल्याप्रकरणी पती चेतन भाऊसाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवरून पत्नीविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please follow and like us: