सीसीटीव्ही फुटेज असुनही अपहरणकर्त्याला व मुलाला शोधण्यात यश नाही.

(स्वदेश मालवीय)
नवी मुंबई-आपल्या बेपत्ता २३ वर्षीय एकुलत्याएक मुलाच्या शोधात आई-वडिलांची शहरभर पायपीट सुरु आहे.यामुलाला एक जण घेवुन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज असुनही पोलीस अद्द्यापही आरोपीला पकडून मुलाला शोधण्यात यशस्वी ठरलेले नाहित.महत्वाचे म्हणजे यासंदर्भात पालक पोलिसांकडे विचारणा करतात तेव्हा त्यांना तपास चालू आहे एव्हढच उत्तर मिळत आहे.
नवी मुंबईच्या के.के आर रोड परिसरात रहाणारा सद्दाम इंतजाम खान(२३ ) हा मतिमंद असून एका पायाने अधु आहे.सद्दाम नेहमी फिरायला जातो व संध्याकाळी घरी परततो . ५ डीसेंबरला  सद्दाम गेला तो  घरी परतालाच नाही.पालकांनी रात्रभर त्याला शोधले परंतु तो न सापडल्याने त्यांनी दुसा-या दिवशी तुर्भे पोलीस स्टेशन,एम्आयडीसी  येथे तक्रार दिली.यानंतर पोलिसांनी सर्व रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज शोधले.त्यात वाशी रेल्वे स्थानकात एका व्यक्ती बरोबर तो जात असल्याचे फुटेज सापडले. सीसीटीवी मधे सफेद रंगाचा शर्ट घातलेला एक अज्ञात युवक नवी मुम्बई येथील वाशी रेल्वे स्टेशन येथून सद्दाम ला घेवुन चालला आहे.हे फुटेज ५ डीसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजताचे आहे.या आधारावर पोलिसांनी त्या अनोळखी व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला व त्याचा शोध घेतला परंतु सद्दाम सापडला नाही.त्याच्या पालकांनी पण सर्वत्र शोध घेतला पण त्यांनाही यश आले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.