सिंघानियाच्या सुलोनियनथॉनमध्ये अनेक विद्यार्थी सहभागी
ठाणे दि.०३- विद्यार्थ्यांत सकारात्मक उर्जा निर्माण होऊन जोश यावा यासाठी ठाण्याच्या सिंघानिया शाळेने काल सुलोनियनथॉनचे आयोजन केले होते. ठाणे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि शाळेच्या प्राचार्या रेवथी श्रीनिवासन यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली.
जुलै २०१८ हा दिवस प्रत्येक सुलोनियन आणि त्याच्या परिवारासाठी एक मह्त्वपूर्ण दिवस होता. “पढ़ लिखकर ज्ञानी बनने से पहले, हम इन्सान बनेंगे” या शालेय गाण्यावर सर्व सुलोनियन परिवार धावण्यास सज्ज झाले. स्पर्धकांमध्ये जोश निर्माण करण्याकरिता झुंबा डान्सचे आयोजन केले होते . येऊर हिल येथील जांभूळपाडा येथे राहणारे विद्यार्थी आणि येऊर शाळेतील विद्यार्थीही या स्पर्धेत सहभागी झाले होते. २०१८-१९ हे सिंघानिया शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात सुलोनियनथॉनने झाली स्पर्धेनंतर स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना पदक देऊन गौरविण्यात आले.