सावत्र पित्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सलग नऊ वर्षे केला लैंगिक अत्याचार

नाशिक दि.१२ – सावत्र पित्याने मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर सलग नऊ वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून पीडितेच्या आईचा संशयित सुनील निमा पंथीकर (रा. टागोरनगर) याच्यासोबत २००९ मध्ये दुसरा विवाह झाला होता. पहिल्या पतीची ही मुलगी २००९ मध्ये पाचवीमध्ये असल्यापासूनच संशयिताचा तिच्यावर डोळा होता. घरखर्च भागत नसल्याने आई मुलीला पतीकडे सोडून अंबड येथे खासगी कंपनीमध्ये कामाला जात होती. याचा फायदा घेत संशयिताने अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी आल्यावर बळजबरीने पकडले व अश्लील चाळे केले. याबाबत आई अथवा इतर नातेवाइकांना काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

संशयित पित्याने पीडितेला ‘वागणूक चांगली’ नसल्याने घरात डांबून ठेवले होते. तिने मामाला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्याने तिची सुटका केली. भाचीसोबत घडलेल्या प्रकाराने धक्का बसल्याने हा प्रकार त्याने बहिणीच्या कानावर घातला. मात्र, प्रारंभी तिने पतीवर विश्वास दाखवत ‘तो असे का करेल’, असा उलट प्रश्न केला. परंतु, मुलीची भेदरलेली अवस्था पाहून मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता घडलेला भयानक प्रकार ऐकून तिलाही प्रचंड धक्का बसला. तिने लागलीच पोलिसांत धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.