सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश मंडळांनी नैसर्गिक तलावात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करावे – महापौर व आयुक्तांचे आवाहन
(श्रीराम कांदु)
कल्याण दि.१८ – नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने कल्याण पूर्व येथे तीन तर कल्याण पश्चिम येथे एक आणि डोंबिवली येथे १० असे एकुण १४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. या तलावात गणेश विसर्जनाकरिता नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि पर्यावरणाचे रक्षण व संवर्धनास हातभार लावल्याबद्दल महापौर विनिता राणे आणि महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नागरिकांचे आभार मानले असून यापुढेही सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश मंडळांनी नैसर्गिक तलावात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहनही महापौर व आयुक्तांनी केले आहे
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेञात एकूण ६८ विसर्जन स्थळे असुन, नैसर्गिक व कृत्रिम तलावामध्ये एकूण १५२३५ गणपतींचे विसर्जन करण्यात आले. नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेने कल्याण पूर्व येथे तीन तर कल्याण पश्चिम येथे एक आणि डोंबिवली येथे १० असे एकुण १४ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. गणेश विसर्जनाकरिता महापालिकेने प्रत्येक विसर्जन स्थळावर सीसीटीव्ही, अग्निशमन कर्मचारी, विदयुत विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तैनात ठेवले आहेत.
निर्माल्य जमा करण्यासाठी डोंबिवली येथील विसर्जन ठिकाणी निर्मल युथ फाउंडेशन, पर्यावरण दक्षता मंडळ या स्वयंसेवी संस्थानी, कल्याण येथे एनएसएस चे विदयार्थी निर्माल्य जमा करन्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगळा करण्यास हातभार लागनार आहे. महापौर व आयुक्तांनी या सर्वांचे आभार मानले.प्रभागातील प्रत्येक विसर्जन घाटांवर संबधित प्रभाग क्षेञ अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे जातीने लक्ष देवून, तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते. पुढील पाच, सात व दहा दिवसांचे गणपती विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावे, असे आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.