सायडिंगला जाणाऱ्या लोकलचा डबा आगीत खाक

ठाणे :मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या सायडिंगला जाणाऱ्या लोकलला आग लागुन या आगीत एक डबा जळून खाक झाला. आग लागली तेव्हा लोकलमध्ये कुणीही नव्हतं त्यामुळं जीवितहानी झाली नाही.

सदर वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली.  या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून त्यात २०१०-बी हा डबा जळून खाक झाला. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळं लागली हे स्पष्ट होऊ शकलं नाही. आग लागली तेव्हा लोकलमध्ये कुणीही नव्हतं त्यामुळं जीवितहानी झाली नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email