सागाव येथील धोकादायक पूलाचे अर्धे काम पूर्ण, महावितरणच्या हटवादीपणामुळे काम रखडले

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०२ – येथील मानपाडा रस्त्यावरील सागाव-स्टार कॉलनी येथील धोकादायक पूलाचे रुंदीकरणाचे काम १६ मीटरपैकी आठ मीटर पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात डांबरीकरण झाल्यानंतर अर्धा भागावरून वाहतूक सुरु होणार असली तरी महावितरण कपंनीने अद्याप पुलाच्या एका बाजूला असलेल्या सहा मुख्य २४०० वोल्टची वायर अद्याप न हलवल्याने अर्धे आठ मीटर रुंदीचे काम रखडले आहे ठेकेदार व महावितरण कपंनी यांच्या वादामुळे हे काम रखडले असून त्याचा त्रास मात्र डोंबिवलीकरांना भोगावा लागत आहे.

मानपाडा रस्त्यावरील धोकादायक पूल हा ९ मीटर रुंदीचा होता तो धोकदायक झाल्याने त्याची पुर्नरबाधणी करण्यासाठी संकेत इंटरप्रईझेस कपंनीला सुमारे ९० लाख रुपयांचा ठेका देण्यात आला २ मे १८ पासून कामाला सुरुवात झाली त्याच वेळी ठेकेदाराने महावितरण कपंनीला पूलावरील उच्चदाबाच्या वाहिन्या हलवण्याची विनंती केली होती. मात्र तेव्हापासून महावितरण कपंनीने हात वर केले व ठेकेदारानेच ते हलवावे अशी अनाकलनिय भूमिका घेतली. त्यामुळे ठेकेदाराने अर्ध्या भागाच्या कामाला प्रांरभ केला व दिड महिन्यात ते काम पूर्ण केले. येत्या दोन दिवसात पूलावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण करुन रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे ठेकेदार संतोष संते यांनी सांगीतले. या पूलावरील वाहतूक बंद असल्याने डोंबिवलीकरांना व ग्रमीण भागातील नागरिकांना मोठा वळसा घालून ये जा करावी लागत असून याचा लाभ रिक्षा चालकानी मनमानी पैसे आकारतात. या संदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकार्याशी संपर्क साधला असता ते मीटिंगमध्ये असल्याचे सांगण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email