सहा महिन्यात १०३ मोबाईल मिसिं आणि १२ मोबाईल चोरी उघडकीस ..

सहा महिन्यात १०३ मोबाईल मिसिं आणि १२ मोबाईल चोरी उघडकीस ..

१२ मोबाईल चोरट्याना अटक

डोंबिवली :- दि. १२ ( प्रतिनिधी )

मोबाईल चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांनी मोबाईल चोरी विरोधी पथक तयार केले आहे. डोंबिवली शहरात या पथकाने पाच महिन्यात १०३ मोबाईल मिसिंग आणि १२ मोबाईल चोरी उघडकीस असून १२ मोबाईल चोरट्याना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष १०३ मोबाईल मिसिंगच्या तक्रारीसंदर्भात डोंबिवलीतील पोलिसांना आंतरराज्य पोलिसांचे सहकार्यामुळे काही मोबाईल परत मिळाले आहे.

कल्याण, डोंबिवली , उल्हासनगर आणि अंबरनाथ या शहरात सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोबाईल चोरी विरोधी पथक तयार केले. प्रत्येक पथकात एक पोलीस निरीक्षक आणि तीन ते चार पोलीस कर्मचारी आहेत. या पथकातील पोलीस निरीक्षक पी. एस. मोरे , पोलीस हवालदार , आर.डी. राठोड, पोलीस नाईक सी.एन.ठोंबरे , पी. एन. पठारे यांच्या कामगिरीमुळे जुलै ते नोव्हेंबर २०१७ या सहा महिन्यात डोंबिवलीत शहारात १०३ मोबाईल मिसिंग आणि १२ मोबाईल चोरी उघडकीस आल्या आहेत. मोबाईळ मिसिंगमध्ये कर्नाटक , आंध्रप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यातून काहीजण असे मोबाईल वापरत होते. पोलिसांनी अश्या व्यक्तींना संपर्क करून हरविलेला मोबाईल वापरत असल्याचे त्यांना सांगितल्यावर त्यांनी मोबाईल परत केले. तर गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणारे हे २५ ते ३० वयोगटातील असून त्यांना या पथकाने अटक केले आहे. ज्यांनी मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली असून त्यांचा मोबाईल परत मिळाला आहे अश्यांना मध्यंतरी कल्याण येथे पोलिसांनी मोबाईल परत करण्यात आले.

चौकट

दुकानदारांना सूचना ….

सदर पथकांला सुमारे ५०० मिसिंग झालेले मोबाईल मिळाले असून अश्या मोबाईलचा वापर कोण करत आहे ? त्याचा तपास सुरु आहे. तसेच डोंबिवलीतील मोबाईल दुकानदारांना पोलिसांनी सूचना दिल्या असून विनाबिल मोबाईल विकत घेऊन ग्राहकांना विकू नये

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email