सहा दिवस उलटुनही बंद झालेली सेवा सुरु होत नसल्याने बीएसएनएलबद्दल नाराजिचे वातावरण
डोंबिवली – डोंबिवली पूर्व येथील विको नाका परिसरातील नाल्यातुन अज्ञात चोरटयानी केबल कापून चोरी केल्याची घटना गेल्या आठवडयात घडली होती.याप्रकरणी मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवण्यात आला होता.परंतु शुक्रवारी घडलेल्या या घटनेला अनेक दिवस लोटूनही यामुळे बंद पडलेली सेवा अद्यापही सुरु झालेली नाही. विको नाका विभागात नाला बनवण्याचे काम चालु आहे. २६ जानेवारी दरम्यान तेथे खोदण्यात आले.यावेळी भारत संचार निगम लिमिटेची केबल उघडी पडली.रात्री चोरांनी ती कापली व चोरून नेली.सकाळी हा प्रकार लक्षात येताच याप्रकरणी मानापाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.सदर केबल चोरीमुळे डोंबिवली एमआयडीसी, कल्याण पूर्व व डोंबिवली ग्रामीणच्या बीएसएनएल उपभोक्त्यांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली.इतके दिवस उलटुनही बंद झालेली सेवा सुरु होत नसल्याने येथे नाराजिचे वातावरण पसरले आहे. डोंबिवली दुरसंचार विभाग जूनियर टेलिकॉम ऑफिसर अनिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार एमआयडीसीचे नाले निर्मितीचे काम पूर्ण होण्यापूर्वी सदर केबल जोडल्यास ती पुन्हा चोरीला जाण्याची भीती असल्याने एमआयडीसीचे नाल्याचे काम होईपर्यंत काही करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.मानापाड़ा पोलीस ठाण्याच्या चार फोन लाईन बंद असून याप्रकरणी उच्च स्तरावरील पोलिस अधिका-यांचा फोन आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान ही सेवा सुरु व्हायला सोमवार पर्यंतचा वेळ लागण्याची शक्याता आहे.