सहा जेष्ठ गुणीजनांचा डोंबिवलीत सत्कार
(श्रीराम कांदु)
डोंबिवली शहराच्या गेल्या सव्वाशे वर्षांच्या वाटचालीतल्या प्रसिद्धीची अपेक्षाही न ठेवता शहरासाठी आपलं अनमोल योगदान दिलं आहे अशा निवडक नागरिकांचा गावकीतर्फे सन्मान करण्याची प्रथा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ४१संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या‘नागरी सत्कार समितीने २०१४ साली सुरु केली . यंदा या उपक्रमाचं पाचवं वर्ष होतं.
गुणीजनांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नव्हे, परंतु त्यांच्या कार्याचा आदर्श पुढल्या पिढ्यांपुढेही रहावा, आणि त्यातून स्फूर्ती घेत सामाजिक बांधिलकी मानणारी,गावकीचे भान राखणारी तरुण कार्यकर्त्यांची नवी पिढी उभी रहावी याउद्देशाने नागरी सत्कार समिती प्रतिवर्षी अशा सहा डोम्बिवलीकर स्त्री-पुरुषांचा सन्मान करते.
यंदाच्या पाचव्या वर्षी (२०१८) सामाजिक क्षेत्रातील विशेषतः अंधत्व निवारण क्षेत्रातील कार्यकर्त्या सरोज नेरुरकर,सामाजिक क्षेत्रातील विशेषतः आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील कार्यकर्त्या हेमा धारगळकर, कामगार क्षेत्रातील श्रीनिवास जोशी, ज्येष्ठ नागरिक संघटन क्षेत्रातील रमेश पारखे, शिक्षण आणि राष्ट्रीय सामाजिक सेवा क्षेत्रातील डॉ. कृष्णन नम्बुद्री तसेच रोटरी, वैद्यकीय मदत क्षेत्रातील एन. आर. हेगडे यांचा सन्मान टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणावर रविवार, दि . ११ फेब्रुवारीसायंकाळी जेष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितित आणि जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कौस्तुभ कुलकर्णी आणि हर्षद महाजन यातरुणांनी सत्कारमूर्तींवर दृक श्राव्य माहितीपट तयार केला होता तर मधुरा ओक हिने त्यांच्या मुलाखती घेतल्या .
कुवळेकर यांनी असे सत्कार म्हणजे समाजातील चांगुलपणाचे प्रतीक आहे असे सांगून माध्यमांनी फक्त सनसनाटी बातम्यांच्या मागे न धावता समाजातील चांगल्या गोष्टींनाही उजेडात आणले पाहिजे तर जोगळेकर यांनी हे सत्कार डोंबिवलीला ललामभूत आहेत असे सांगून सहभागी संस्थांची संख्या पाच वर्षात दुप्पट झाली व त्यात तरुणांच्या संस्थांचा सहभाग आहे या बद्दल आनंद व्यक्त केला .
रवींद्र चव्हाण यांचा कुलाबा जिल्हापालक मंत्री झाल्याबद्दल , राहुल दामले आणि मंदार हळबे यांचा स्थायी समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता क.डों .म.पा. या पदी निवड झाल्याबद्दल तसेच मधुकर चक्रदेव यांचा नागरी सत्कार समितीचे पांच वर्षेयशस्वी नेतृत्व केल्याबद्दल सत्कार करण्यात आला .
समिती विश्वस्त माधव जोशी, विनोद करंदीकर, प्रवीण दुधे यांचा कार्यक्रमातसहभाग होता .
Please follow and like us: