सर्व महत्वाचे दस्ताऐवज 1 जूनपासून महापालिका संकेतस्थळावर

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचामहत्वपूर्ण निर्णय

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागाच्यावतीने करण्यात येणा-या कामाशी संबंधित सर्व महत्वाचे दस्ताऐवज, नस्ती आता महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी 1 जून 2018 पासून करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणा-या विविध कामांविषयी लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच माहिती अधिकारामध्ये मागविली जाते. या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे यापुढे पहिल्या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी दिलेल्या नस्ती, दुस-या टप्प्यात प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतची सर्व प्रक्रिया व त्यानंतर तिस-या टप्प्यात कार्यादेश दिल्यानंतरची सर्व प्रक्रियांचे दस्ताऐवज 1 जूनपासून महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरम्यान महापालिका आयुक्त श्री. जयस्वाल यांनी यापूर्वीच विविध कामाचे कार्यादेश महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता सर्वांना महापालिकेच्या संकेतस्थळावरून माहिती मिळणे सुलभ होणार आहे.

त्याचबरोबर नवीन नियुक्ती, माहिती अधिकारात देण्यात आलेली माहिती, प्रशासकीय आदेश, अपिलिय अधिका-यांकडून घेण्यात आलेल्या सुनावण्या यांची माहितीही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email