सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात १३ डिसेंबरला सुट्टी
(श्रीराम कांदु )
ठाणे दि ११: ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकानिमित्त बुधवार १३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्रभाग क्षेत्रे आणि पाचही पंचायत समिती क्षेत्रात राज्य शासनाच्या आदेशान्वये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या पंचायत समिती क्षेत्रात कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि मुरबाड यांचा समवेश आहे.
कार्यक्षेत्राबाहेरील मतदारांना देखील भरपगारी सुट्टी
सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून जे मतदार या कार्यक्षेत्राच्या बाहेर कामानिमित्त असतील त्यांना देखील भरपगारी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश उद्योग, उर्जा, कामगार विभागाने काढले असून यामध्ये खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, अन्न गृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, मॉल, शॉपिंग सेन्टर्स, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या यांना लागू आहेच शिवाय या मतदान क्षेत्रात मतदार असलेले शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मांडले, केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम आणि बँका यामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील सार्वजनिक सुट्टी लागू राहील असे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांनी कळविले आहे.
काही अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास सुट्टी देता येत नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगाराना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून दोन ते तीन तासांची सवलत देता येईल मात्र यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. याबाबत मतदारांकडून कोणतीही तक्रार आल्यास आस्थापानांविरुध्द कारवाई करण्यात येईल.