सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी अर्पण केली आदरांजली
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात, सरदार पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला, राष्ट्रपती भवन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही पुष्पांजली अर्पण केली. याआधी सकाळी राष्ट्रपतींनी नवी दिल्लीतल्या पटेल चौकात, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.
Please follow and like us: