सरकार डाँक्टरांवरील हल्ले आणि हिंसाचाराबाबत गंभीर नसल्याने चिंता
डोंबिवली दि.०४ – डोंबिवली शाखेच्या वतीने डाँक्टर डे साजरा करण्यात आला. अद्याप सरकार डाँक्टरांवरील हल्ले आणि हिंसाचाराबाबत गंभीर नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली असून, डाँक्टरांवरील हल्ले सहन न करण्याचा ध्यास डाँक्टरर्स डे मध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमास खा.डॉ. श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. खा. शिंदे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. पालिकेच्या निवृत्त वैद्यकीय अधिकारी डाँ. स्मिता रोडे, डोंबिवली आय एम ए शाखेच्या अध्यक्ष डाँ अर्चना पाटे, सचिव डाँ वंदना धाकतोडे, ,खजिनदार डॉ. सुनित उपासनी व्यासपिठावर उपस्थित होते. गेल्या काही वर्षात डाँक्टरांवरील हल्ला व हिंसाचाराने गंभीर स्वरुप धारण केले असल्याचे मत सर्व डाँक्टरांनी मत व्यक्त केले. याबाबत केंद्र सरकारने कायदा करावा ,रुग्णालय संरक्षित क्षेत्र घोषित करावे. सायबर ट्रोलींग हिंसाचार म्हणून ओळखावे. सरकारकडे या व इतर मागण्या या करण्यात आल्या. डॉ. भोसले यानी सादर केलेल्या स्टँड अप काँमेडीने उपस्थित जणांची मने जिंकली. हा कार्यक्रम तिन सत्रात विभागून मोठ्या उत्साहजनक वातावरणात डाँक्टरर्स डे साजरा करण्यात आला. डाँ नितिन उपासनी, भक्ती लोटे, मिना पुथ्वी, मंकरद गणपुले, इत्यादिनी कार्यक्रम यशस्वी होण्यास मेहनत घेतली.