सरकार आता व्हॉट्सअॅप वर बंधने आणणार”

(म.विजय)

मुंबई दि.०७ – व्हॉट्सअॅप हे आपल्या देशातील सर्वात मोठे बोला चालीचे एक माध्यम बनले आहे. त्यामुळे अनेक कामे सोपी होतात. मात्र हे व्हॉट्सअॅप आता माथेफिरू आणि समाज विघातक लोक वापरून समाजात द्वेष पसरवत आहे. तर चिथावणीखोर मेसेज पसरतात म्हणून अनेक लोक अडचणीत सापडून त्यांना जीव गमवावा लागला आहे. चिथावणीखोर मेसेजना पसरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजन करण्यात याव्यात, असे आदेश सरकारने व्हॉट्सअॅपला दिले आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने व्हॉट्स अॅपला इशारा देताना म्हटले आहे की, फेसबुककडे मालकी हक्क असलेली कंपनी आपली जबाबदारी आणि उत्तरदायित्व टाळू शकत नाही. तुम्ही योग्य ती पावले उचला अन्यथा तुमच्यावर कारवाई करू असा सज्जड दम दिला आहे.

सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या मेसेजमुळे देशातील विविध भागात जमावाकडून काही लोकांची हत्या झाल्या आहेत. त्यामुळे सरकार प्रचंड संतापले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रतज्ञान मंत्रालयाने आसाम, महाराष्ट्र, कर्नाटक, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटना ह्या दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हणत या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली.

त्यामुळे येत्या काळात ग्रुपचा अॅडमीन आणि वयक्तिक मेसेज पसरवणारे चांगलेच अडचणीत येणार आहे. सरकार याबाबत लवकरच कायदा आणणार आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email