सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणारे जेरबंद

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणारे जेरबंद

श्रीराम कांदू

सुशिक्षित बेरोजगार तरूणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवून लाखो रूपयांचा गंडा घालणा-या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे. नाशिकमधील दिलीप पाटील यांचा मुलगा मयुर पाटील आणि इतर अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांना पाटबंधारे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस लावतो असं सांगून दिनेश लहारे यानं साडेसतरा लाखांची फसवणूक केली होती. त्यांना पैसे देणा-या कोणालाच त्यांनी नोकरी न लावता पैसेही परत दिले नाही म्हणून त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे आणि त्यांच्या पथकानं दिनेश लहारे हा गणेश टॉकीजजवळ येणार असल्याची माहिती मिळवली होती. त्यानुसार आलेल्या दिनेश लहारेला अटक करण्यात आली. लहारेनं सुशिक्षित बेरोजगार तरूणांना नोकरीचं आमिष दाखवलं. रेल्वे, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सेल्सटॅक्स, प्रादेशिक परिवहन कार्यालय, टपाल, पोलीस, वीज अशा विभागांमध्ये कनिष्ठ लिपिक, हेल्पर, शिपाई, पोलीस उपनिरिक्षक, अभियंता अशा पदांसाठी नियुक्तीचं आमिष दाखवून त्यानं आत्तापर्यंत ३१ उमेदवारांची एकूण साडे शहाऐंशी लाखांची फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. त्यानं आणखी ३० उमेदवारांची फसवणूक केल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या विभागातील नियुक्त्यांची पत्रं, उच्चस्तरीय अधिका-यांचे शिक्के, खोट्या सह्या, शासनाच्या विविध विभागांचे ३३ शिक्के हस्तगत करण्यात आले आहेत. लहारे याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून विनय दळवी, शंकर कोळसे-पाटील, रमेश देवरे, प्रवीण गुप्ता अशा चौघांना अटक करण्यात आल्याचं अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email