सफाई कामगारांच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०५ – कल्याण पश्चिमेकडील आंबेडकर रोड वरील सफाई कामगार वसाहतीच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. महापालिकेने ४२ वर्षापूर्वी उभारलेली हि इमारत धोकादायक झाली असून याबाबत सफाई कामगारांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करत डागडुजी अथवा पुनर्वसनाची मागणी केली. मात्र प्रशासनाकडून या मागणी कडे दुर्लक्ष होत असल्याने सफाई कामगार या इमारती मध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील आंबेडकर रोड येथे सफाई कामगारासाठी प्रशासनाने १९७२ साली इमारत उभारली होती. या इमारती मध्ये सफाई कामगारांचे २० कुटुंब वास्तव्य करत आहेत. मात्र काही वर्षापासून या इमारतीची दुरावस्था झाली असून महापालिका प्रशासनाने हि इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. या इमारती चा स्लॅबची पडझड असून काही महिन्यापूर्वी स्लब कोसळल्याने वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली होती. याबाबत सफाई कामगारांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी करत दुरुस्ती मागणी केली मात्र प्रशासनाने या इमारतीकडे ढुंकूनही बघितले नसल्याने या सफाई कामगार जीव मुठीत धरून या इंमारती मद्ये वास्तव्य करत आहेत .आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास याच इमारतीचा स्लब पुन्हा कोसळला सुदैवाने बाहेर कुणी नसल्याने दुर्घटना टळली असली तरी या इमारटी मध्ये राहणार्या सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबाचा जीव टांगणीला लागला आहे. एकीकडे शहारतील इमारतीना धोकादायक ठरवून कारवाईचा बडगा उगारणार्या पालिका प्रशासनाला स्वतःच्या धोकादायक मालमत्तेचा मात्र विसर पडला कि काय असा सवाल उपस्थित केला जात आहे ,याबाबत सफाई कामगारांनी आम्ही या इमारतीच्या डागडुजी व दुरुस्ती बाबत अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र आम्ही चतुर्थ श्रेणीचे काम असल्याने प्रशासन आमच्या कडे दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप केला तर याबाबत पालिकेचे `क` प्रभाग अधिकारी विनय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता सदर इमारत पालिकेची मालमत्ता असून सदर इमारत धोकादायक असून या इमारती मध्ये राहनार्या सफाई कामगारांचे पुनर्वसन करन्याबाबत मालमत्ता विभागाला कळवले असलायचे सांगितले तर मालमत्ता विभागाचे संबंधित अधिकारी अमित पंडित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email