सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे उद्यान स्वच्छता अभियान
(श्रीराम कांदु)
ठाणे:सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील एन.एस.एस, एन.सी.सी ,सिव्हील डिफेन्स व बॉटनी विभागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालया समोरील असलेले ठाणे महानगर पालिकेचे उद्यान स्वच्छता अभियानाला सुरुवात केली.
“ स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे “या कल्पनेला अनुसरून महाविद्यालयाचे अंतरंग सुंदर केले आहेच त्याच बरोबर महाविद्यालया समोरील उद्यानाची स्वच्छता करून त्याची सजावट करण्याचे हे अभियान तीन टप्प्यात होणार आहे स्थानिक नगरसेवक नरेश म्हस्के यांच्या शिफारशीने या उद्यानाची जवाबदारी महाविद्यालयावर सोपवली आहे ते नेहमी या कामासाठी सहकार्य करतात .पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात जवळ जवळ तीन ट्रक भरतील इतके अनावश्यक वाढलेले गवत व झाडे झुडपे विद्यार्थ्यांनी बाहेर काढले.
या अभियानासाठी महाविद्यालयाच्या एन ,एस ,एस प्रमुख प्रा सुरेश हलबांडगे,प्रा महेश कुलसंगे,प्रा मनोज वाघ ,प्रा आनंद यादव ,प्रा एकनाथ पवळे,प्रा विनोद कुशवाह ,व प्रा मंदा इंगळे यांनी मुलांचे वेगवेगळे गट करून कामाची विभागणी केली व सकाळी ७ ते १० या वेळेत या अभियानाचा पहिला व दुसरा टप्पा दि १८ ते २० जानेवारी २०१८ रोजी पार पडला
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक महिन्यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील आदिवासी पाडा येथे रिकाम्या सिमेंट गोण्यातून माती भरून बंधारा बांधला व तेथील पाणी टंचाई दूर करण्यास काही अंशी हातभारही लावला.
महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. सौ.सरिता हजरनीस यांनी या उद्यानात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.सौ.एस.एस. यांनी या उद्यानाला भेट देऊन मुलांचे कौतुक केले.संपर्क ९८२१७८६५४३.