संशयित जलमापक चोरांची छायाचित्रे देऊनही कारवाई करण्यास पोलीसांची टाळाटाळ
(श्रीराम कंदु)
डोंबिवली दि.१३ – डोंबिवलीत आतापर्यत सुमारे ४०० जलमापके चोरीला गेली असून संशयित चोरांचे छायाचित्र विष्णूनगर पेालीसांना देऊनही पोलीस कारवाई करण्याचीटाळाटाळ करत असून जलमापके चोरीमुळे पालिकेचे उत्पन्न बुडत असल्याची तक्रार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने पोलीस उपायुक्ताकडे केली आहे.
गेल्या तीन महिन्यात सुमारे ४०० पेक्षा जास्त जलमापके चोरीला गेली असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात नागरिकांनी लेखी तक्रारकेली असून अशा ४०० एफआयआर नोंद करण्यात आले असून त्याशिवाय नागरिकांना जलमापके बसवून दिली जात नाही पुन्हा जलमापके बसवण्यासाठी प्रत्येकी ६००० रुपये भुर्दंड नागरिकांना बसत आहे शिवाय जलमापके नसल्याने पालिकेचे उत्पन्नही बुडत असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांनी निदर्शनाल आणले आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुध्द सराफ यांना विचारले असता त्यानीही संशयित चोराचे छायाचित्र विष्णूनगर पोलीसांना देऊनही पेालीस काही कारवाई करत नाहीत शिवाय याचे सीसीटीव्ही मध्ये चोर कैद झाला असून तो सर्व पुरावा पोलीसांना दिला आहे. पण गेल्या तीन महिन्यात पोलीसांनी काहीच कारवाई केली नाही असेही त्यांनी सांगीतले. डोंबिवलीतील १७३ इमारतीतील सुमारे १५७ जलमापके चोरीला गेली असून चोरी थांबवण्यासठी पोलीस काहीच उपाय करत नाहीत याबदल त्यानी आश्चर्य व्यक्त केले संशयित चोर पण सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीसांना हे सर्व पुरावे दिले असल्याचे ते म्हणाले.