संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर आता ‘सीआयडी’च्या रडारवर !

नगर – येथील पोलिसांनी केलेल्या चौकशीमुळे आता माजी महापौर संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे.खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सून सुवर्णा कोतकर हिच्यासोबत बोलणे झाले होते. मात्र, सासरेच नव्हे, तर पती संदीप कोतकर याच्याशी मोबाईलवरून संभाषण झाले होते. त्याला मोबाईल व सीमकार्ड कसे पुरविण्यात आले, हेही चौकशीतून पुढे आल्याचे समजते

संदीप कोतकर हा कारागृहात असतानाच मोबाईल संभाषण झाल्याने तेथील अधिकारी व कर्मचारीही संशयाच्या फेर्‍यात अडकणार आहेत. पोलिसांनी ही बाब चव्हाट्यावर येऊ दिलेली नव्हती. हा प्रकार रेकॉर्डवर आलेला असल्याने संदीप कोतकर व सुवर्णा कोतकर हे दाम्पत्य आता ‘सीआयडी’च्या रडारवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोतकर कुटुंबियांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email